पंचभुतांचा गोंधळ । क
161.
पंचभुतांचा गोंधळ । केला एके ठायी मेळ ।
लाविला सबळ । अहंकार त्यापाठी ॥१॥
तेथे काय मी ते माझे । कोण वागवी ते ओझे ।
देहा केवी रिझे । हे काळाचे भातुके ॥२॥
जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण ।
संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ॥३॥
इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल ।
तुका म्हणे मोल । झाकले तो पावेल ॥४॥
