वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

लाभ झाला बहुता दिसी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072740 · अभंग क्र. १६२

162.
लाभ झाला बहुता दिसी । लाहो करा पुढे नासी ।
मनुष्यदेहा ऐसी । उत्तम जोडी जोडीली ॥१॥
घेई हरिनाम सादरे । भरा सुखाची भांडारे ।
झालिया व्यापारे । लाहो हेवा जोडीचा ॥२॥
घेउनी माप हाती । काळ मोजी दिवस राती ।
चोर लाग घेती । पुढे तैसे पळावे ॥३॥
हित सावकासे । म्हणे करीन ते पिसे ।
हाती काय ऐसे । तुका म्हणे नेणसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग