पुढे ज्ञानेश्वर जोडो
1091.
पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर | बोलतो उत्तर स्वामिसंगे ॥१॥
पाळिले पोसिले चालविला लळा | बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा ॥२॥
स्वामीचिया योगे जालो स्वरूपाकार | उतरलो पार मायानदी ॥३॥
निवृत्तीने हात उतरिला वदना | त्यगिले निधाना आम्हालागी ॥४॥
नामा म्हणे देवा देखवेना मज | ब्रह्मी ज्ञानराज मेळविला ॥५॥
