वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 196. भक्ती स्तोम माजविणाऱ्या वेशधार्यास उपदेश

भ्क्तीस्तोम माजविणाऱ

🙏 4. संत नामदेव · ABH-081935 · अभंग क्र. १८४२

1842.

भ्क्तीस्तोम माजविणाऱ्या वेशधाऱ्यास उपदेश.

त्यागेंविण विरक्ति | प्रेमावांचुनि भक्ति |शांति नसता ज्ञप्ति | शोभा न पवे ॥१॥
दमनेवांचुनि यति | मननेंविण मुनिपति |योगी नसता युक्ति | शोभा न पवे ॥२॥
बहिर्मुख कवि मति | नेमावांचूनिया वृत्ति |बोधेविण महंती | शोभा न पवे ॥३॥
अनधिकारा व्युत्पत्ति | गुरु तो कनिष्ठ याति |मा ते मीच शिष्यवृत्ति | शोभा न पवे ॥४॥
हेतुवांचुनि प्रीति | गुणरहित स्तुती |करणीवांचुनि कीर्ति | शोभा न पवे ॥५॥
सत्समागमसंगती | बाणली नसता चित्ती |नामा म्हणे क्षिति| शोभा न पवे सर्वथा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग