निष्ठा ते भजन वाचे न
861.
निष्ठा ते भजन वाचे नारायण । तया सत्य पेणे वैकुंठीचें ॥१॥
ऐसे वेदशास्त्रे पुराणे सांगतीं । नामे जोडे मुक्ति नारीनरां ॥२॥
भलतिया भावे मुखी नाम गावे । तयासै राणिवे वैकुंठीचें ॥३॥
एक जनार्दनी प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिल डोळा धन्य झालों ॥४॥
