काळ्या कांबळ्याची घड
236.
काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥
कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखी ॥२॥
मुखामाजी कवळ । सवंगडे घालिउती सकळ । वैकुंठीचा पाळ । ब्रह्मानंदे डुल्लत ॥३॥
तृप्त झाला जनार्दन । एका वंदीतसे चरण । काया वाचा मन । खुन भक्त जाणती ॥४॥
