वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(निर्याणाचे अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079796 · अभंग क्र. ३६१८

3618.
(निर्याणाचे अभंग)
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥
ना भी ना भी भक्तराया । वेगी पावलो सखया ॥धृपद॥
दुरूनि येता दिसे दृष्टी । धाके दोष पळती सृष्टी ॥२॥
तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरी आला ॥३॥

अर्थ :
शंख, चक्र, पद्म व गदा हातात असलेला हरी पलीकडे आलेला आहे. आणि तो म्हणत आहे हे माझ्या भक्तराया माझ्या सखया ‘भिऊ नकोस भिऊ नकोस मी त्वरेने तुझ्याकडे येतोय’. दुरुन पुरुषोत्तम येताना माझ्या दृष्टीला दिसत आहे व त्याच्या धाकाने दोष जिकडे वाट दिसेल तिकडे पळत सुटले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हरीने मला एकटयाला पाहिले त्यामुळे तो वैकुंठाहून माझ्याकडे आला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग