वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

संसारासाठी निघाली हा

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081013 · अभंग क्र. १०६

106.
संसारासाठी निघाली हाहा । तमाशा पाहिला मोठा रे ॥
होता संचिताचा विक्रा केला । सर्वही आटला पोटा रे ॥
असत्याचे माप टाकुनी देई । सांडी हरी विक्राई खोटी रे ॥
सत्याची तागडी धरून हाती । बसी मुक्ती चौहाटा हे ॥
नामाचे केणे भरी तोचि भला । अभागी चुकला करंटा रे ॥
विठोबा पाहुणा जोड झाली घरी । मोकळ्या चारी वाटा रे ॥
बोधला म्हणे आम्हा थोर लाभ झाला । हाकारिल्या चारी पेठा रे ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग