वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

उच्चारिता नाम वाचे ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089244 · अभंग क्र. १००४

1004.
उच्चारिता नाम वाचे ।
झाले त्याचे स्वरुपचि ॥१॥
नाही तया उरले दुजे ।
आत्मतेजे जग भासे ॥२॥
ब्रम्हानंदी निमग्न वृत्ति ।
विराजती स्वानंदे ॥३॥
निळा म्हणे गुणातीत ।
अखंडित निजबोधे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग