नारद सांगे मृत्युलोक
296.
नारद सांगे मृत्युलोकी । हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ॥1॥
कैसा सत्त्वाचा समुद्र । ऐसा नाही नृपवर ॥2॥
नारदाची ऐकून गोष्ट । सुखावला तो वसिष्ठ ॥3॥
कोप विश्वामित्रा आला । कैसा वाढविता शिष्याला ॥4॥
तपतेजे सूर्यराशी । छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥5॥
उदय पश्चिमे दिनकर । सत्त्व ढाळीना नृपवर ॥6॥
वसिष्ठाच्या ऐकुनी बोला । विश्वामित्रा क्रोध आला ॥7॥
जरी उतरेल माझ्या तुकी । देईन आपुल्या तपासी ॥8॥
ऐसा दोघांचा संवाद । होता उठला नारद ॥9॥
इंद्र म्हणे का निर्फळ । शब्दाशब्दी वाढेल कळ ॥10॥
ऐसे ऐकता वचन । जनी म्हणे केले गमन ॥11॥
