पंढरीचे प्रेम आहे ज्
435.
पंढरीचे प्रेम आहे ज्याचे जीवी |त्याची नित्य नवी करीन आशा ॥१॥
ते माझे सोयरे सुखिचे सद्गुरू |भवसिंधूचा पिरु उतरती ॥२॥
माझ्या विठोबाच्या नामी ज्या विश्वास |होईन त्यांचा दास आवडीचा ॥३॥
माझ्या विठोबाच्या चरणी ज्यांचा भाव |दारवंटा पाय धरीन त्यांचे ॥४॥
माझ्या विठोबाचे ध्यान ज्याचे मनीं|सांडोवा अंगणी होईन त्याचे ॥५॥
ऐसे सर्वभावे विठोबासी शरण|त्यांचे वंदीन चरण नामा म्हणे ॥६॥
