परियेसी वासने संकल्प
1422.
परियेसी वासने संकल्प स्वरूपे | विश्व त्वा आटोपे वश केले ॥१॥
ब्रह्मादिक तुझे इच्छेचे खेळणे | विषयाकारणे लोलिंगत ॥२॥
परि माझ्या मना सांडी वो समर्थ देई मज दीनाते कृपादान ॥३॥
वेदशास्त्रवक्ते वित्पन्न थोरले | तृणापरीस केले हळुवट ॥४॥
कृपणाचे द्वारी होऊनि याचक विसरले सुख आत्महित ॥५॥
एके अभिमाने भ्रांत जाले चित्त | भजती इंद्रियाते दीनरूपे ॥६॥
शब्द स्पर्श रूप रसगंधे फांसा | गुंतले दुराशा तळमळित ॥७॥
येकाते लाविला पुत्र कलत्र धंदा | नेणती ते कदा सुखगोष्टी ॥८॥
जन्म मरणांचे जुंपियले पांती | आकल्प भोगिती नाना योनी ॥९॥
ऐसे तुझे संगे बहु जालो हिपुटी | पाडिली तुटी संतसंगा ॥१०॥
नामा म्हणे पुढती गांजिसील मज | येईल केशिराज सोडवणे ॥११॥
