वीतभर पोट लागलेंसे प
1423.
वीतभर पोट लागलेंसे पाठी | साधुसंगे गोष्टी सांगू न देई ॥१॥
पोट माझी माता पोट माझा पिता | पोटाने ही चिंता लाविलीसे ॥२॥
पोट माझा बंधु पोट माझी बहीण | पोटाने हे दैन्य मांडिले ॥३॥
विष्णुदास नामा पोटाकडे पाहे | अझुन किती ठाये हिडविसी ॥४॥
