आज्ञापिले जे श्रीहरी
759.
आज्ञापिले जे श्रीहरी ।
तेचि वदली हे वैखरी ॥१॥
नाही माझे येथ वीर्य ।
जाणे ज्याचे तोचि कार्य ॥२॥
येईल जरी हे प्रतिती ।
धरा तरी हे हितचि चित्ती ॥३॥
निळा म्हणे सांडिजे येरी ।
नास्तिक वादी परते दुरी ॥४॥
759.
आज्ञापिले जे श्रीहरी ।
तेचि वदली हे वैखरी ॥१॥
नाही माझे येथ वीर्य ।
जाणे ज्याचे तोचि कार्य ॥२॥
येईल जरी हे प्रतिती ।
धरा तरी हे हितचि चित्ती ॥३॥
निळा म्हणे सांडिजे येरी ।
नास्तिक वादी परते दुरी ॥४॥