काय सांगो देवा ज्ञान
16.
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखी वदविले ॥१॥
कोठवरी वानू याची स्वरूपस्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागो नेदी वारा । ऐसे जगदोद्धारा बोलविले ॥३॥
नामा म्हणे यांनी तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवे ॥४॥
