वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

देवा मी चांडाळ चांडा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079785 · अभंग क्र. ४०७४

4074.
देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणता लागताहे वेळ ।
नसे पाहाता भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥१॥
जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म ते अझुनी ।
सत्य आचरण नेणे स्वप्नी । निखळ खाणी अवगुणाची ॥२॥
भक्ती दया अथवा कथा । कानी न साहवे वार्ता ।
अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥३॥
काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर ।
यांचे तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥४॥
निंदा द्वेष घात विश्वास । करिता नाही केला आळस ।
करू नये ते केले संतउपहास । अभक्ष ते ही भिक्षले ॥५॥
पाळिले नाही पितृवचन । सदा परद्वारी परधनी ध्यान ।
बोलो नये घडले ऐसे अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनी ॥६॥
कायामने वाचा इंद्रियाशी । सकळ पापंचिच राशी ।
तुकयाबंधू एसीयासी । आलो हृषिकेशी तुज शरण ॥७॥

अर्थ :
देवा मी चांडाळ आहे चांडाळ आहे हे म्हणण्यासाठी देखील मला वेळ लागत आहे. माझ्यासारखा अमंगळ आणि दुष्ट या भूमंडळावर पाहण्यास गेले तर दुसरा कोणीही नाही. देवा मी ज्या दिवशी जन्मलो तेव्हापासून ते आतापर्यंत अजूनही असत्यच कर्म करतो आहे. सत्य आचरण तर मी स्वप्नातही केले नाही मी तर केवळ अवगुणाची खाणच आहे. देवा भक्ति, हरीकथा, दया याविषयी मी कानाने ऐकले तर मला ते सहन होत नाही. देवा विषयाची तळमळ माझ्यामध्ये अखंड आहे. अशा प्रकारे मी अधमाहूनही अधम आहे. काम, क्रोध, दंभ, अहंकार, गर्व, ताठा, मद, मत्सर हे सर्व उत्पन्न होण्याचे माहेरघर म्हणजे माझे शरीर आहे. एखादयाने जर दुस-यावर उपकार केले तर तो मला वै-याप्रमाणेच वाटतो. परनिंदा व्देष विश्वासघात हे करण्यासाठी मी कधीही आळस केलाच नाही. आणि करु नये ते संतांची हेळणा मी केली आण

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग