वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

येकी सांगे मातु । ये

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074379 · अभंग क्र. ६७०

670.
येकी सांगे मातु । येकी सांगे रे तु ।
तो कोण दृष्टांतु । सखिये सांगे ॥१॥
बाई येक सरे । नाही पै दुसरे ।
निवृत्ति दातारे । सांगितले ॥२॥
पाचांची मिळणी । साही चक्रपाणी ।
दशमाची कहाणी । येकादश ॥३॥
ज्ञानदेवी सार । चौ वेदी पार ।
येकतत्त्वी विचार । विज्ञानेसी ॥४॥

अर्थ :
तू ज्या श्रीकृष्णाला पाहिले आहेस त्याची एखादी तरी गोष्ट मला सांग. त्या परमात्म्याच्या ठिकाणी दुसरेपणाचा मुळीच संबंध नाही. अशी खूण त्याच्या स्वरुपाविषयी निवृत्तिरांयानी सांगितली आहे. पंचकोशाहून वेगळा सहावा, दहा इंद्रियाहून वेगळा अकरावा, चारी वेदाहून पलीकडचा अशा परमात्म्याच्या एकत्वाविषयी विचार केला. तर तो विचारच विज्ञानासह परमात्म्याच्या ठिकाणी एकरुप झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग