माझे स्वरुप म्याचि श
669.
माझे स्वरुप म्याचि शृंगारिले ।
निर्वाणी म्या केले लयाकार ॥१॥
आपुली सोय वाढवावया गेले ।
तव आपणचि जाले आपण्याठायी ॥२॥
सहज गुणाचे निर्गुण वो केले ।
माझे ग्या पाहिले मन मावळुनी ॥३॥
तीन चारी मिळोनी येके ठायी घातली ।
बापरखुमादेविवरा विठ्ठली फावली ॥४॥
अर्थ :
माझे स्वरुप मीच शृंगारले म्हणजे विचार करुन निर्वाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी लय केला. मी आपल्या स्वरुपाची वाढ करण्याकरिता परमात्म्याचा विचार करु गेले, तो परमात्मा दुसरीकडे कोठे नसून तो माझेच स्वरुप आहे. असे जाणून मी तद्रूप झाले. अविद्येमुळे जीव गुणयुक्त झाला आहे. विचार करुन पाहिले असता जीवाचे सहज निर्गुण स्वरुप प्रतीतीला आले. आणि त्या स्वरुपांत मन हे मावळून गेले. त्रिगुणांने युक्त मे अंतःकरणचतुष्टय ते एका आत्मस्वरुपाच्या ठिकाणीच घातले. तेव्हांच मला माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांची प्राप्ती झाली. असे माऊली सांगतात.
