वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 125. उपमन्युकथा - अभंग ३४४४ ते ३४५१

ऐकोनी दुधाची बोली ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084135 · अभंग क्र. ३४४९

3449.
ऐकोनी दुधाची बोली । का मनी निष्ठुरता केली । श्रियाळ सत्वें राखिली । नगरी नेली वैकुंठा ॥१॥
अंबऋषीच्या बोला । दाहीही अवतार नटला । माझे देखोनि उणिवाला । दूध कांहे न देसी ॥२॥
शरीर कर्वतीं भेदीन । अष्टांग योग साधीन । भक्तिबळे तुज काढीन । हुडकोनी तत्वता ॥३॥
ऐकोनी तो शब्द करुणा । एका जनार्दनी धांवे जाणा । माझिया भक्ताचिया वचना । उणिवता येऊ नेदी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग