विश्वचि विठ्ठल विस्त
220.
विश्वचि विठ्ठल विस्तारला सर्व ।
विकारेचि देव अंतरला ॥१॥
ठकुनिया बुद्धि ठसावली माया ।
ठमकत गेलीया श्रुति मागे ॥२॥
लंघिली साधने लक्ष हरपले ।
लघुत्व घेतले साधनांनी ॥३॥
बहेणि म्हने तो हा विठ्ठल पाहता ।
आली अद्वयता सहज मना ॥४॥
