वीज पडे गनन गडाडी ।
530.
वीज पडे गनन गडाडी ।
रचिली परवडी कशाची ॥१॥
अदभुत प्रकाशाचा लोळ ।
पडता अंतराळ दणाणीत ॥२॥
काय हे तुमची कैशा लीला ।
नेणवे सकळा चोजविता ॥३॥
निळा म्हणे गर्भी बाळा ।
वाढवा गोपाळा कैशा परी ॥४॥
530.
वीज पडे गनन गडाडी ।
रचिली परवडी कशाची ॥१॥
अदभुत प्रकाशाचा लोळ ।
पडता अंतराळ दणाणीत ॥२॥
काय हे तुमची कैशा लीला ।
नेणवे सकळा चोजविता ॥३॥
निळा म्हणे गर्भी बाळा ।
वाढवा गोपाळा कैशा परी ॥४॥