रसना एकी रस तो नाना
529.
रसना एकी रस तो नाना ।
कैसी विवंचना रचिली हे ॥१॥
नकळे लाघव तुमचे हरी ।
करिता भरोवरी जाणिवेच्या ॥२॥
काय पिंजूनी मेघपडळ ।
घडिले ज्वाळ विजुवाचे ॥३॥
निळा म्हणे तडक भारी ।
फुटे अंबरी कासियाचा ॥४॥
529.
रसना एकी रस तो नाना ।
कैसी विवंचना रचिली हे ॥१॥
नकळे लाघव तुमचे हरी ।
करिता भरोवरी जाणिवेच्या ॥२॥
काय पिंजूनी मेघपडळ ।
घडिले ज्वाळ विजुवाचे ॥३॥
निळा म्हणे तडक भारी ।
फुटे अंबरी कासियाचा ॥४॥