वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ७, संत ज्ञानेश्वर गौळणी

अवचिता परिमळु झुळकला

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073181 · अभंग क्र. १९६

196.
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले । ठकचि मी ठेले काय करु ॥२॥
मज करा का उपचारु अधिक ताप भारु । सखिये शारंगधरु भेटवा का ॥३॥
तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ॥४॥
भरली दृष्टि जंव डोळा न्याहाळी । तव कोठे वनमाळी गेला गे माये ॥५॥
बोधोनि ठेले मन तंव झाले अने आन । सोकोनि घेतले प्राण माझेगे माये ॥६॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणे कायामनेंवाचा वेधियेले ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग