पूर्वजन्मी सुकृते थो
11.
पूर्वजन्मी सुकृते थोर केली । ती मज आजि फळासि आली ॥१॥
परमानंदु आजि मानसी । भेटी झाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे । यांते भेटावया मन न धरे ॥३॥
एकएका तीर्थहूनी आगळे । तयामाजी परब्रम्ह सांवळे ॥४॥
निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनी प्राण प्रगटला ॥५॥
वत्स बिघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥
हे पियुषा परते गोड वाटत । पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥
बापरखुमादेविवरु विठ्ठले । संत भेटता भव दु:ख फिटले ॥८॥
