श्रीसंतांचिया माथा च
38.
श्रीसंतांचिया माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१॥
विश्रांती पावलो साभाळा उत्तरी । वाढले अंतरी प्रेमसुख ॥२॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसे । नव्हे अनारिसे उद्धरलो ॥३॥
तुका म्हणे मज न घडता सेवा । पूर्वपुण्यठेवा ऒढवला ॥४॥
