वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

गोपाळाशी खेळती | आनं

🙏 4. संत नामदेव · ABH-083050 · अभंग क्र. २७८

278.
गोपाळाशी खेळती | आनंदे डोलती |कृष्ण आमुचा सांगाती | डो डो डो डो डो ॥१॥
कान्होबाची संगती | ब्रह्मादिक इच्छिती |धन्य आम्ही म्हणती | अ ल ल ल ल ॥२॥
कृष्णाप्रती गोपाळ | म्हणताती सकळ |अकळसी नाकळ | हा त त त त ॥३॥
मामा मारू गेलासी | आपटिले गजाशी |मल्लयुद्ध खेळलासी | हू तू तू तू तू ॥४॥
अजगर मारिला | वडवानळ गिळिला |गोवर्धन उचलिला | अ ब ब ब ब ॥५॥
पुतनेशी शोषिले | नारदासी मोहिले |गणिकेसी उद्धरिले | अ रे रे रे रे ॥६॥
गौळियाचे घरा जाशी | दही दूध लोणी खासी |त्यांच्या सुना मोहिसी | छी छी छी छी छी ॥७॥
सोळा सहस्र भोगिसी | ब्रह्मचारी म्हणविसी |लटिकेची ठकविशी | लु लु लु लु लु ॥८॥
सोडोनिया मी पण | आम्हा घाली लोटांगण |परब्रह्म नारायण | आ हा हा हा हा ॥९॥
ऐसे तुझे पवाडे | वर्णिताती वाडेकोडे |विष्णुदास नामा म्हणे | यु यु यु यु यु ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग