वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

प्रात:काळी प्रहार रा

🙏 4. संत नामदेव · ABH-083035 · अभंग क्र. २७९

279.
प्रात:काळी प्रहार रात्री गौळणी बाळा । घुसळण मांडियेले घरोघरी सकळा ।
नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सावळा ॥१॥
घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदे छंदे डोलती ॥ध्रु०॥
एक म्हणती साजणी तुम्ही लपवागे लोणी । नकळे हो बाई कृष्णाची करणी ।
कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी । खास खांदूनि तुम्ही आता लपवा दुधाणी ॥२॥
बोलता चालता इतुक्यामध्ये हरी आला । कवणेही नाही देव द्दष्टि देखिला ।
सूक्ष्म रूप धरूनि डेर्‍यामध्ये प्रवेशला । वरच्यावरी देव लोणी खाऊनिया गेला ॥३॥
उन्हवणी शिळवणी घालिती परते लोणी येईना । काय झाले ढोणे सासूबाई कळेना ॥४॥
हा हा गे बायांनो तुमचे जाणते चाळे । यश्वदेच्या मुला नेऊनि देतसा गोळे ।
उगोंचि मग पाहता आता फिरगे निराळे । मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥
डेर्‍यामधून मार माझा जगजीवन पाहे । नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काये ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग