वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ५, नामग्रहण १५६ ते १६०

पतीतपावन श्रीहरि । र

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075179 · अभंग क्र. १६०

160.
पतीतपावन श्रीहरि । रामकृष्ण मुरारी ।
या वाहे चराचरी । तो एक स्वामी जी आमुचा ॥
धन्य धन्य आमुचे जन्म । मुखी रामराम उत्तम ।
जया रामनामे प्रेम । तोचि तरेल सर्वथा ॥
आयुष्य जाऊ नेदी व्यर्थ । हरिनामी जो आर्त ।
हरिवीण नेणे आणिक पंथ । धन्य जन्म तयाचा ॥
ज्ञानदेवे नेम केला । श्रीहरि हृदय सांठविला ।
त्यांनी संसारा अबोलाआला । देह खचला संत संगे ॥

अर्थ :
पतितपावन असणारा त्या श्रीहरिला रामकृष्ण ह्या नांवाने संबोधतात तेच हा चराचराचे व आमचे स्वामी आहेत. ज्याला रामानामाविषयी प्रिती आहे सतत ते रामनाम तो जपतो तोच तरुन जातो त्याचा जन्म धन्य होतो. हरिनाम सोडुन अन्य पंथात तो जात नाही त्या हरिचे नाम आयुष्याचा क्षण वाया न घालवता आर्ततेने घेतो त्याचा जन्म धन्यतेला पावतो. ज्याने हा हरिनाम नेम हृदयापासुन केला त्याचा संसाराशी अबोला झाला व त्याचा देह संतसंगात पडला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग