वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

एक गावू आम्ही विठोबा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073652 · अभंग क्र. ७

7.
एक गावू आम्ही विठोबाचे नाम । आणिकांचे काम नाही आता ॥१॥
मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥२॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळघोष । सेवू ब्रम्हरस आवडीने ॥३॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रे ॥४॥
=
तुकाराम महाराज म्हणतात फक्त एका त्या हरीचे नाम गावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा हेच काय ते आता आमचे काम आणि हेच काय ते आम्ही जाणतो, बाकी इतर कसलेही काम आम्ही जाणत नाही म्हणजेच इतर कोणत्याही कठीण अशा साधनांकडे आम्ही वळत नाही ना त्यांचे आमच्याकडे काही चालत. ते म्हणतात कर्माच्या, संसाराच्या तसेच योग साधनांच्या सूक्ष्म आणि दुस्तर अशा वाटा आम्ही सोडून दिल्या आहेत आणि नामाने जी वाट आम्हांला दिसत आहे त्या वाटेवरूनच आम्ही परमार्थाचा राज्यकारभार पुढे रेटू. तसेच हाथी टाळ, मृदंग घेऊन नामाचा जयघोष करत आम्ही हरिकिर्तनाचा ब्रम्हरस आवडीने सेवत राहू. तुकोबाराय म्हणतात अशा या नामाच्या गजराने, नामसंकीर्तनाने जे महापातकी आहेत, मोठमोठे जे पतित आहेत त्यांचे कल्याण होऊन त्वरित त्यांचे हित साधले गेले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग