नाम न म्हणे आवडी|व्य
762.
नाम न म्हणे आवडी|व्यर्थ वाचे बडबडी॥१॥
जिव्हा नव्हे ती वाचक|भोगी आळसे नरक॥२॥
करी आरालिया निंदा| परी न म्हणे गोविंदा॥३॥
असत्या आवडी|सदा वाचेसी रोकडी॥४॥
निंदेवांचूनि पातक| सत्या जाण माझी भाक॥५॥
गर्जे नामाचे पवाडें| पाया कळिकाळ पडे॥६॥
नाही ज सहज चैतन्य|नामा म्हणे नाम जाण॥७॥
