निजगुजा गुज तो । मोह
22.
निजगुजा गुज तो । मोहना मोहन ते गे बाई ॥
बोधाबोध बोधविता तो । द्वैताद्वैत अद्वैत तो गे बाई ॥
राखुमादेविवरू तो । सर्वादि सर्वेश्वरू तो गे बाई ॥
अर्थ :
तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे. बोधाचा बोध देणारा व द्वैताद्वैतातील अद्वैत तोच आहे. सर्वामधिल तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
