भावना जयाची जये ठायी
288.
भावना जयाची जये ठायी जैसी ।
फळप्राप्ती तैसी होय तया ॥१॥
काय तो संदेह असे या अर्थासी ।
पाहिजे क्रियेसी अंगी बळ ॥२॥
ज्ञानप्राप्तीलागी भजेल जो नर ।
ज्ञानचि निर्धार होय तया ॥३॥
बहेणि म्हणे हेत धरी जैसा भक्त ।
तेणेचि तो मुक्त होय भावे ॥४॥
