पुलक धर्म रोमांच नाह
1734.
पुलक धर्म रोमांच नाही जब उठिले | सजळ नाही जाले नयन जंव ॥१॥
तंव हरिभक्तिचे सुख कळले जे म्हणती | लटिके बोलिजेति उभयलोकी ॥२॥
ऐसा भक्तिप्रेमा देई जी देवा | सर्व भावे सेवा घडे तुझी ॥३॥
श्रवणी ऐकता नाम वाचे बोले | नाही सुखावले मन त्याचे ॥४॥
श्रीहरीचे नाम म्हणविता न म्हणे | मा सहज उच्चारणे कैचे त्यासी ॥५॥
दर्दुराचे परी जिव्हा वटवटी | सांडोनि हरिगोष्टी आणिक सांगे ॥६॥
देवाच्या मूर्ती संत महंत देखोनी | न वचे लोटांगणी भावे त्यासी ॥७॥
न लावी त्यांचे रज टकामका पाहत | बुजवण जैसे सेत राखे तैसे ॥८॥
ऐसे कैक प्राणी आहेति मूढमति | हित सांगता चित्त दुःख वाटे ॥९॥
नामा म्हणे केशवा मी तुझे दीन| नेणे तुजवांचोन आन दुजे ॥१०॥
