वेणू वाहोनी सांवळा |
1733.
वेणू वाहोनी सांवळा | गाई चारिसी गोवळा ॥१॥
का वा न येसि धांवत | विठ्ठल माझे कुळदैवत ॥२॥
अंगी चंदनाची उटी | पदक मिरविले कंठी ॥३॥
गळा माळ वैजयंती | सुदर्शन घेऊन हाती ॥४॥
कासे पितांबर शेला | विटेवरलिया विठ्ठला ॥५॥
नामा म्हणे पीडिलो भुके | देई प्रेमाचे भातुके ॥६॥
