रुक्मिणीसी सांगे स्व
3470.
रुक्मिणीसी सांगे स्वये कृष्णनाथ । याचे वस्त्र त्वरित आणुनि द्यावे ॥१॥
आणूनियां ग्रंथीं देई जगन्माता । वस्त्र अलंकार तत्वता काढुनी ठेवा ॥२॥
जीर्ण ते वस्त्र करुनी परिधान । वंदिले चरण कृष्णजीचे ॥३॥
एका जनार्दनी करुनी नमन । निघाला ब्राम्हण तेथोनिया ॥४॥
