डोळियाची भुक हारपली
491.
डोळियाची भुक हारपली । पाहता श्रीविठ्ठल माउली ॥१॥
पुंडलिकें बरवे केले । परब्रह्मा उभे ठेले ॥२॥
अठ्ठावीस युगें जालीं । आद्यापि न बैसे खालीं ॥३॥
उभा राहिला तिष्ठत । आलियासी क्षेम देत ॥४॥
ऐसा कृपाळु दीनाचा । एका जनार्दनी साचा ॥५॥
