वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

भुंकुनिया सुने लागे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080772 · अभंग क्र. ३३६६

3366.
भुंकुनिया सुने लागे हत्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥
काय त्या मशके तयाचे करावे । आपुल्या स्वभावे पीडतसे ॥धृपद॥
मातले माकड विटवी पंचानना । घेतले मरणा धरणे तेंणे ॥२॥
तुका म्हणे संता पीडितील खळ । घेती तोंड काळे करूनिया ॥३॥

अर्थ :
गावामधे जर एखादा हत्ती आला तर त्या हत्तीच्या मागे कुत्रे भुंकत भुंकत पाठीमागे पळतात हत्तीला त्याचा काहीच परिणाम होत नाही परंतू कुत्रा कष्टी होतो आणि भुंकून भुंकून दु:खी पावतो. हत्तीच्या पुढे ते कुत्रे अगदी चिलटाप्रमाणे आहे ते हत्तीचे काय वाटोळे करणार परंतू त्यांचा स्वभावच भुंकणे आहे आणि त्याचा स्वभावच त्याला त्रासदायक ठरतो. अहो माजलेले वानर सिंहाला छळवते त्यावेळी असे समजावे की त्याने मरणासाठीच धरणे धरले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत हे हत्तीप्रमाणे व बलाढय सिंहाप्रमाणे आहेत आणि दुष्ट लोक हे अगदी कुत्र्याप्रमाणे चिलटाप्रमाणे व वानराप्रमाणे आहेत जरी दुष्टांनी संतांना त्रास दिला त्यांचा छळ केला तरी असे करुन ते दुष्ट लोक आपले तोंड काळे करुन घेतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग