वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

महातेजा आत बिंदु कोण

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075151 · अभंग क्र. ४४२

442.
महातेजा आत बिंदु कोणे परी ।
उष्ण तेजा माझारी साक्ष पाहा ॥१॥
कुंडलिनी उर्ध्वमुखे अग्नी सोडी ।
तयाची हे जोडी संत जना ॥२॥
ज्ञानेश्वर म्हणे आत्मा याते जाणे ।
सुनिळ अनुभवणे निवृत्ति पाहा ॥३॥

अर्थ :
ब्रह्मरंधातील तेजोमय नीलवर्ण ज्योतीतील तेजाचा कोणत्याही रीतीने अनुभव घ्या. प्राणायामाच्या योगाने योगाभ्यासी पुरूषांची कुंडलिनी नाडी जागृत होऊन ती वर तोंड करून अग्नी सोडते. व त्यामुळे संत लोकांना वरील तेजोमय ज्योतीचा अनुभव येतो. या तेजाला मी आत्मा समजतो. या ज्योतीचा अनुभव घ्यावयाचा असेल तर निवृत्तीनाथांना शरण जा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग