वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

नवाचिया माझारी आऊटपी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075099 · अभंग क्र. ४४३

443.
नवाचिया माझारी आऊटपीठाशेजारी ।
शून्याची ओवरी सुनिळ प्रभा ॥१॥
जीवदशामय अंगुष्ठ प्रमाण ।
तयावरी अज्ञान प्रवर्तते ॥२॥
चैतन्याची मुस त्यामाजी ओतली ।
अव्यक्त देखिली वस्तु तेथे ॥३॥
तव ते मसुरे प्रमाण तया नांव महाकारण ।
गुरूमुखे खूण जाण बापा ॥४॥
ज्ञानदेव म्हण यापरते जाण ।
नाही नाही आण निवृत्तीची ॥५॥

अर्थ :
नवद्वारे असलेल्या या शरीरातच महाकारण स्थानातील औटपीठा शेजारी योग्यांना जेथे निलज्योती दिसते. अशी वोवरी म्हणजे महाकारण देह आहे. तसेच दुसरा अंगुष्ठमात्र आकाराचा जीवदशायुक्त लिंग देह आहे. त्याच शरीरात अज्ञानाची पुढिल कार्योत्पत्ति होते. वरिल वर्णन केलेल्या दोन्ही देहाच्याही आत केवळ चैतन्याची बनलेली अशी जेथे ती वस्तु आहे. तिचा आकार मसुरे प्रमाणे असून त्यालाच पहिल्या चरणांत सांगीतल्याप्रमाणे महाकारण हे नाव आहे. त्याची ओळख गुरुमुखाने करुन घे. या परते जाणावयाचे असे काही नाही. असे निवृत्तीरायांची शपथ घेऊन मी सांगतो. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग