वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

केशव कैवल्य कृपाळ| न

🙏 4. संत नामदेव · ABH-083413 · अभंग क्र. ७५६

756.
केशव कैवल्य कृपाळ| नारायणे उद्धरिला अजामेळ|माधव मनी धरा निश्चळ| गोविंद गोपाळ गोकुळीचा॥१॥
विष्णु विश्वाचा जिव्हाळा| मधुसूदन माउली सकळां|त्रिविक्रमे रक्षिले गोवळा| वामने पाताळी बळी नेला॥२॥
श्रीधरे धरा धरिली पृष्ठी| ह्रषिकेश उभा भीवरेंतटी|पद्मनाभ पुंडलिकासाठीं| दामोदरे गोष्टी पांडवांशी॥३॥
संकर्षणे अर्जुनासी संवाद केला | वासुदेवे अवचिता वाळी वधिला|प्रद्युम्न समुद्रावरी कोपला| अनिरुद्धे छेदिला सहस्त्रबाहो|४|पुरुषोत्तमे केला पुरुषार्थ| अधोक्षजे हिरण्यकश्यपा मारिली लाथ|नरहरि प्रल्हादा रक्षित| स्मरावा अच्युत स्वामी माझा॥५॥
जनार्दने रावणादि वधिले| उपेंद्रे अहिल्येसी उद्धरिलें|हरि हरि म्हणता दोष जळालें| कृष्णे तारिले गणिकेसी॥६॥
या चोवीस नामांचे करिता स्मरण| जन्ममरणाचे होय दहन|विष्णुदास नामा करी चिंतन| चरण ध्यान मज देई॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग