एक तत्त्व नाम दृढ धर
376.
एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा ये{ई}ल तुझी ॥१॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधी ॥२॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणि पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा ॥४॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥
