वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 6. सर्व संतांचे हरिपाठ › २, संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा

जाणीव नेणीव भगवंती न

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073578 · अभंग क्र. ३७५

375.
जाणीव नेणीव भगवंती नाही ।
हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा ।
तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
ते जीवजंतूंसी केवी कळे ॥३॥
ज्ञानदेव फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥धृपद॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग