प्रकरण :- ॥ भक्तवत्स
284.
प्रकरण :- ॥ भक्तवत्सलता ॥
आमुची भावना आम्हांसी फळली । उफराटी चाली दिसोनी आली ॥१॥
तुमचे संगती कोण सुख झाले । आमुचे आम्हा कळले वर्म त्याचे ॥२॥
प्रल्हादे घेतिला तुमचा नाम छंद । केला असे वध पितियाचा ॥३॥
पहा ते रावण कुंभकर्ण सहपरिवारे । मारियले वर तुम्ही त्यासी ॥४॥
अज्ञान बाळका लागलासे छंद । गोंविला अढळ पद देवोनिया ॥५॥
ब्राह्मणाचे पोर रडे दुधासाठी । दिली तया वाटी क्षीरसिंधु ॥६॥
द्रौपदी कारणे कौरवांची शांती । करोनी धर्माप्रति राज्य दिले ॥७॥
ऐसेचि ठकविले मोठे मोठे जाणा 1 कितीसा उगाणा करू तुमचा ॥८॥
नामयासी वेडे पिसे केले त्वा हरी । काय तुझी थोरी सांगू आता ॥९॥
माळी कुंभाराचे निसंतान केले । आपणचि उठविले मूल त्याचे ।१०॥
चोखा म्हणे ऐसा विपरीत खेळ । खेळता सकळ तुम्ही देवा ॥११॥
