वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

आकार स्थुळ नाशिवंत ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072874 · अभंग क्र. १६

16.
आकार स्थुळ नाशिवंत । हे तरी जाईल भुमिआंत ।
तयावरी हरि चालत । तेणे होईल कृतकृत्य ॥१॥
देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥२॥
दूजा गुण आपी मिळे । तरी मी होईन गंगाजळे ।
हरि अभिषेक अनुदिनी । सुखे सर्वांगावरी खेळे ॥३॥
तिजा गुण तेजरुप । तरि मी होईन महृदीप ।
हरि रंगणी दीपमाळा । दीप उजळीन समीप ॥४॥
वायु व्यापक चौथा गुण । तरि मी विंजणा होईन ।
हरि अष्टांगे निववीन । ऐशा दृढ धरीन खुणा ॥५॥
आकाश पांचवा गुण । तरी मी प्रासादी राहेन ।
बापरखुमादेविवरा । अखंड तुझे अनुसंधान ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग