योगिये शिणती तुझिये
538.
योगिये शिणती तुझिये प्राप्तिलागी | नातुडसी जगी कवणासी ॥१॥
एक जटा नखे स्वये वाढविती | दिगंबर होती एक देवा ॥२॥
त्यासी तुझी भेटी नव्हेचि कल्पांती | अखंड सिणती साधनाने ॥३॥
आमचे सन्निध सर्वदा राहसी | आमच्या भाग्यसी पार नाही ॥४॥
धन्य जालो आम्ही तुझिया प्रसादे | नाचे तुझ्या छंदे नामदेव ॥५॥
