वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पाळियेले लळे । माझे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080763 · अभंग क्र. ३२४३

3243.
पाळियेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥१॥
बहुजन्माचे पोषणे । सरते पायापाशी तेणे ॥धृपद॥
सवे दिली लागो । भाते आवडीचे मागो ॥२॥
तुका म्हणे भिन्न । नाही दिसो दिले क्षण ॥३॥

अर्थ :
विठ्ठल कृपाळू आहे त्याने आजपर्यंत माझे सर्व लाड पूर्ण केलेले आहेत. अहो या विठ्ठलाने मला खूप जन्मांतरापासून पोसले आहे माझे पालनपोषण केले आहे आणि त्याने त्याच्या पायापाशी मला सरते म्हणजे मान्य केले आहे. त्याने मला खूप जन्मांपासून त्याच्याजवळ राहण्याची सवय लागू दिली आहे त्यामुळे मला जे आवडेल ते खाऊ मी त्याला कायम मागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाने एक क्षणभर देखील मला त्याच्यापासून भिन्न दिसू दिले नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग