वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

माझे जिवीची आवडी ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074928 · अभंग क्र. ४७०

470.
माझे जिवीची आवडी ।
पंढरपूरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगी मन रंगले ।
गोविंदाचे गुणी वेधले ॥२॥
जागृती स्वप्न सुषुप्ति नाठवे ।
पाहता रूप आनंद साठवे ॥३॥
बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण ।
रूप विटेवरी दाविली खूण ॥४॥

अर्थ :
माऊली म्हणतात, माझ्या मनात पंढरपूरास हातात पताका घेऊन वारीला जावे अशी फार आवड आहे. त्याचे कारण माझे मन त्या पंढरीरायाचे गुण वर्णन ऐकून रंगून गेले आहे. त्यामुळे माझ्या मनाला पंढरीरायाच्या भेटीचा ध्यास लागला आहे. ज्याच्या ध्यासामुळे मी जागृतित आहे किंवा स्वप्नात की झोपेत आहे याची आठवण मला राहिली नाही. ज्याच्या रूपाकडे पाहिल्यावर आनंद हृदयांत साठवतो. असा ते रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल समचरण ठेऊन उभे आहेत. व आपल्या समचरण ठेवण्यामध्ये सगुण व निर्गुण ही दोन्ही ही रुपे एकआहेत. अशी तो आपली खूण दाखवित आहे. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग