वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

ऐसी हे गर्जवू वैखरी

🙏 3. संत तुकाराम · ABH-079734 · अभंग क्र. ४०४०

4040.
ऐसी हे गर्जवू वैखरी । केशवा मुकुंदा मुरारी । राम कृष्ण नामे बरी । हरी हरी दोष सकळ ॥१॥
जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महृदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥धृपद॥
चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥२॥
मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाटयकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणे ॥३॥
गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळो ॥४॥
कासयाने घडे याची सेवा । काय एक समर्पावे या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय वेगळेजीवा न करी तुका ॥५॥

अर्थ :
देवा आम्ही आमच्या वैखरी वाणीने तुझे नाम केशवा, मुकुंदा, मुरारी, राम कृष्ण हरी ही तुझी नामे आम्ही आमच्या वाणीने घेऊ. कारण ती चांगली आहेत व हे तुझे नाम सर्व दोषाचे हरण करतात. हे जनार्दना जगजीवना, विराटस्वरुपवामना, हे महृदत्त्वादी मधुसूदना, भवबंधन तोडणा-या देवा, हे चक्रपाणी गदाधरा, असूरमर्दना, सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ वीरा, सर्व शूरामध्ये मुकूटमणी असणा-या, अहो जगाला दान देणा-या दातारा, देवा तू मदनमूर्ती मनमोहन आहेस गोपाळ व गोपीकांना रमविणा-या, अहो कान्होबा तुम्ही नटनाट्य करण्यामध्ये अतिशय कुशल असून सर्वगुणसंपन्न आहात हे गुणवंता आणि निर्गुणा, सर्वामध्ये साक्षी राहून सर्व जाणणा-या, सर्व जगाची लय, उत्पत्ती, स्थिती करुन देखील हा अकर्ता राहतो कर्तेपणाचा अभिमान कधीही तो अंगाला लागू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाची सेवा कोणत्या पध्दतीने कोणत्या प्रकाराने करावी याला काय समर्पण करावे हा एक मोठा प्रश्न आह

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग