अल्प भाव अल्प मती ।
4039.
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाही हाती । अपराधाची वोळिलो मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥
किती दोषा देऊ परिहार । गुणदोषे मळिले अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । लागे अंतपार ऐसे नाही ॥धृपद॥
विविध कर्म चौऱ्याशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पाजरा । जन्म जरा मरण साठवण ॥२॥
जीवा नाही कुडीचे लाहाते । ये भिन्नभिन्न पंच भूते । रचते खचते संचिते । असार रिते फलकट ॥३॥
पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळती काष्ठे लोटता पूर । आदळे दूर होती खल्लाळी ॥४॥
म्हणोनि नासावे अज्ञान । इतुले करी कृपादान । कृपाळु तू जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥५॥
अर्थ :
अहो वेदमूर्ती माझा भक्तिभावही थोडा आहे, माझी बुध्दीही थोडी आहे, माझे आयुष्यही थोडे असून तेही माझ्या हाती नाही. माझी मूर्ती म्हणजे पूर्ण अपराधाचीच आहे त्यामुळे तुम्ही माझे म्हणणे ऐका. देवा माझे अंतरंग अनेक गुणदोषानी मलिन झाले आहे किती दोषाचा म्हणून तुम्हाला मी परिहार देऊ ? देवा माझ्या आधीचे वर्तमानातील आणि भविष्यातील संचित कर्माचा विचार केला तर त्याचा अंत:पारच लागणार नाही. विविध प्रकारच्या संचित कर्मामुळे चौ-याऐंशी लक्ष योनीच्या फे-या घ्याव्या लागतात व त्यामुळे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे त्रिविध भोग भोगावे लागतात. असे शरीराचे कर्म कोठार असते व त्यामध्ये जन्म, जरा आणि मरणच साठवलेले असते. तसे पाहिलेस तर जीवात्माचा आणि देहाचा काहीही संबंध नसून पंचभूते ही वेगवेगळी आहेत. या शरीराचे काही दिवस पालनपोषण होते ते वाढते व काही दिवसाने पुन्हा ते बिघडते असे हे शरीर असा
