वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 16. हरिश्चंद्र आख्यान

ऋषि अंगणी कामिनी । ल

🙏 16. संत जनाबाई · ABH-073918 · अभंग क्र. ३००

300.
ऋषि अंगणी कामिनी । लोळती येउनी दोघीजणी ॥1॥
तुम्हा दिला कोणे त्रास । त्याचा करीन मी ग्रास ॥2॥
आम्ही बोलिलो रायासी । घेत नाही उचितासी ॥3॥
ऐसे बोलता वचन । राव कोपला दारुण ॥4॥
केले प्रधाने ताडण । बाहेर घातले मारुन ॥5॥
त्यांच्या परिसोनी बोला । विश्वामित्र कोपे आला ॥6॥
म्हणे रायासी अधमा । माझी प्रताप महिमा ॥7॥
वसिष्‍ठाच्या पडिभारे । मातलासी द्रव्ये थोरे ॥8॥
निर्वैर श्वापदांसी । कांरे मारिले तयासी ॥9॥
वधूनिया शेवटी त्यासी । मारियेल्या तापस दासी ॥10॥
पुढे रसाळ आहे कथा । निद्रा लागेल नृपनाथा ॥11॥
स्वप्नी मागेल दानासी । म्हणे नामयाची दासी ॥12॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग